अरुण शौरींचा भाजपला घरचा अहेर, दरवाढ योग्यच !

September 24, 2012 12:05 PM0 commentsViews: 3

24 सप्टेंबर

एनडीए सरकारमधले माजी निर्गुंतवणूक मंत्री आणि भाजप नेते अरुण शौरी यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे. डिझेल दरवाढ आणि एफडीआयच्या निर्णयांचा भाजप विरोध करतंय. त्याचवेळी शौरी यांनी या धाडसी निर्णयांबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रशंसा केली आहे. सरकारने आणखी कठोर आर्थिक निर्णय घ्यायला हवेत, असंही त्यांनी म्हटलंय. शौरींच्या या वक्तव्याचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे.

close