भिवंडीत गणेशोत्सवानिमित्त लेझर शो

September 24, 2012 12:20 PM0 commentsViews: 45

24 सप्टेंबर

भिवंडीमध्ये गणेशोत्सवानिमित्त भव्य लेझर शोचं आयोजन करण्यात आलं आहे. भिवंडीच्या शिवाजी चौकात या लेझर शो सध्या दाखवला जात आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा लेझर शो असल्यामुळे आबाल वृद्ध सार्‍यांचंच तो आकर्षण ठरत आहे. हा शो पहाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून नागरिक येत आहेत. शहरातला मध्यवर्ती शिवाजी चौक या शोमुळे चांगलाच गजबजून गेला आहे.

close