राज ठाकरेंविरुद्ध अटक वाँरट जारी करण्याचे आदेश

December 19, 2008 5:55 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबर, मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी त्वरीत अजामीनपात्र अटक वाँरट जारी करावं, असं आदेश जमशेटपूर कोर्टानं दिले आहेत. राज ठाकरे यांनी छटपूजेबाबत केलेल्या विधानावर कोर्टानं काल हे आदेश दिले. ज्युडीशियल मॅजिस्ट्रेट ए. के. तिवारी यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. जमशेदपूरचे एक वकील हमीद रझा खान यांनी राज ठाकरे यांच्या विधानामुळे उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या, अशा आशयाची एक याचिका जमशेदपूर कोर्टात दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. आता यापुढील सुनावणी 7 जानेवारीला होणार आहे. राज ठाकरे यांनी त्यावेळी कोर्टात हजर राहावं, असे आदेश जमशेदपूर कोर्टानं दिले आहेत.

close