भारताची सावध सुरुवात

December 19, 2008 6:18 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबर, मोहाली भारत आणि इंग्लंड दरम्यानची दुसरी टेस्ट आजपासून सुरु झाली. अपुर्‍या प्रकाशामुळे मॅच सुरु होण्यास दहा वाजले. टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतलेल्या भारतीय टीमला दुसर्‍याच ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. धडाकेबाज ओपनर विरेंद्र सेहवाग शून्यावर आऊट झाला. मोहालीत सकाळी पडणार्‍या दवाचा छान फायदा स्टुअर्ट ब्रॉडनं उचलला. त्याच्या एका सुरेख स्विंग झालेल्या बॉलवर विकेट कीपर प्रायरकडे कॅच देऊन सेहवाग आऊट झाला. चेन्नई टेस्टमध्ये शानदार विजय मिळवून देणारी टीमच भारताने या टेस्टसाठी कायम राखलीय तर इंग्लंडने टीममध्ये एक बदल केलाय. जखमी स्टिव्ह हार्मिसन ऐवजी स्टुअर्ट ब्रॉडला संधी देण्यात आलीय. सेहवाग आऊट झाल्यावर सध्या फॉर्म हरवलेला राहुल द्रविडच तिसर्‍या क्रमांकावर बॅटिंगला आला. त्याने मग गौतम गंभीरच्या साथीने इंनिंग सावरली. गंभीर आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीला मुरड घालून जबाबदारीनं बॅटिंग करतोय. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गंभीर 35 तर द्रविड 11 धावांवर खेळत होता.

close