वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेणार -मुख्यमंत्री

September 25, 2012 4:47 PM0 commentsViews: 4

25 सप्टेंबर

अजित पवार यांच्या राजीनाम्याचं पत्र मला मिळालं आहे. त्यांनी या पत्रात काही पर्यायी व्यवस्था करण्याबद्दल काही सुचना केल्या आहे. या पत्राबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या श्रेष्ठींशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची सावध प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मात्र आताच काही निर्णय घेता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय. विरोधी पक्ष शिवसेना,भाजपने अजित पवारांच्या दबावाला बळीनं पडता राजीनामा स्वीकारावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस याबद्दल काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close