अजित पवारांशिवाय उपमुख्यमंत्रीपदी कोणीची नाही -पटेल

September 26, 2012 10:35 AM0 commentsViews: 3

26 सप्टेंबर

अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी नव्यानं कोणाचीही निवड केली जाणार नाही असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांनी राजीनामा देण्याच्या निर्णय हा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सहमतीनंतर घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाशी राष्ट्रवादी सहमत असून त्यांच्या आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत असंही पटेल यांनी स्पष्ट केलं. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासह दोन्ही मंत्रिपदांचा राजीनामा दिल्यानंतर अर्थ आणि ऊर्जा खात्याचा पदभार जयंत पाटील आणि राजेश टोपे यांच्याकडे द्यावा अशी शिफारस केली होती. पण उपमुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु होती.

close