अंतिम निर्णय शरद पवार घेतील -पिचड

September 26, 2012 10:39 AM0 commentsViews: 8

26 सप्टेंबर

आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहे. अजित पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. त्यांच्या राजीनाम्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार योग्य तो निर्णय घेतील त्यांचा निर्णय हा अंतिम राहील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिली. आज राष्ट्रवादीच्या आमदार,खासदार, मंत्र्यांची विधिमंडळाची बैठक पार पडली. माजी विधानसभा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांचे आज कर्करोगामुळे निधन झालं. त्यामुळे आज कोणतीही राजकीय चर्चा केली जाणार नसल्याचं पिचड सांगितलं. येत्या 28 तारखेला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. ही बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. या बैठकीत शरद पवारांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे.

close