गडकरींवर कायदेशीर कारवाई करणार – विलासराव देशमुख

December 19, 2008 7:22 AM0 commentsViews: 1

19 डिसेंबर, मुंबई मुंबईवरील दहशतवादी हल्ला झालेला असताना विलासराव देशमुख 2 हजार कोटी रुपये खर्चाचं रस्त्याचं टेंडर काढण्यात गुंतले होते, या भाजप नेते नितीन गडकरींनी केलेल्या आरोपाचा विलासरावांनी इन्कार केला आहे. नितीन गडकरींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केलं. ' अतिशय चुकीचा आरोप आहे. इंडिया बुल कंपनीशी माझ्या मुलाचा आणि अहमद पटेल यांच्या मुलाचा काही संबंध नाही. गडकरींनी माझ्याकडून खातरजमा करायला हवी होती. सभागृहात कित्येक वर्ष आम्ही एकत्र काम केलंय. कसलाही संबंध नसताना केवळ प्रसिद्धीसाठी गडकरी यांनी आरोप केले आहेत. गडकरींच्या बदनामीकारक वक्तव्यावर कायदेशीर कारवाई करणार ', असं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितलं.

close