मोटरमन्सच्या संपामुळे हजारो मुंबईकरांचे झाले हाल

December 19, 2008 5:00 AM0 commentsViews: 4

उदय जाधव 19 डिसेंबर, मुंबई मुंबईत गुरुवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या मोटरमन्सनी अचानक संप पुकारल्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. रात्री साडे नऊच्या सुमारास पश्चिम रेल्वेची सेवा कोलमडली. स्टेशनमध्येच अडकून राहिल्याने चिडलेल्या प्रवाशांनी चर्चगेट आणि इतर स्टेशन्सवर तोडफोड केली. रात्री सव्वा अकराच्या सुमाराला प्रशासनानं मागण्यांचा विचार करण्याची तयारी दाखवल्यानं रेल्वेसेवा पूर्ववत सुरू झाली. गुरुवारी दिवसभर वेगवेगळ्या मागण्यांसाठी ' उपाशी राहून नियमानुसार काम 'असं आंदोलन केलं. या आंदोलनाचा लोकलवर परिणाम होणार नाही, असा प्रशासनाचा दावा होता. पण, दिवसभर उपाशीपोटी गाड्या चालवणारे दोन मोटरमन्स रात्री बेशुद्ध पडले आणि मोटरमन्सनी अचानक संप पुकारला. त्यामुळे रात्री साडे नऊच्या सुमारास चर्चगेट स्टेशनवरुन एकही ट्रेन धावेना. तेव्हा घरी जाणार्‍या मुंबईकरांनी आपला राग रेल्वे स्टेशनवर तोडफोड करुन काढला. प्रवाशांनी चर्चगेट स्टेशनवर केलेल्या तोडफोडीमुळे पश्चिम रेल्वेच्या इतरही स्टेशनवर गोधळाचं वातावरण होतं.

close