गणेश निधी :..आणि तिने ‘मुलगी नको’चा विचार बदलला !

September 29, 2012 7:42 AM0 commentsViews: 39

माधव सावरगावे, बीड

29 सप्टेंबर

स्त्री भ्रूणहत्येमुळं बीड जिल्हयाचं नाव देशभरामध्ये गाजलं. जन्मापुर्वीच मुलींचा जीव घेणार्‍या या जिल्हयात मुलींच्या अस्तित्त्वालाच धोका निर्माण झाला. पण याच जिल्ह्यात अशीही काही उदाहरणं आहेत, जिथे मुलींना निर्धोकपणे जन्म तर घेऊ दिला जातोच. शिवाय त्यांच्या जन्माचं स्वागतही होतं. हा बदल घडवण्यासाठी प्रयत्न करतंय ते 'सावित्रीबाई फुले महिला मंडळ'.

बीड जिल्हयातील पाडळशिंगी इथं आपल्या 3 मुलींबरोबर राहणारी शिवकन्या चौधरी. मुलगी नको म्हणून गर्भपात करणार्‍या मानसिकतेला सणसणीत चपराक देणारं तिचं उदाहरण. रोजंदारी करुन कुटुंब सांभाळण्याचं शिवधनुष्यही निरक्षर असलेली शिवकन्याचं पेलते. शिवाय अपंग पती. चोहोबाजुनी संकटं असतानाही 'मुलगी नको' हा विचार तिने बदलला. दोन मुली झाल्यानंतर तिसरी मुलगी होईल म्हणून अनेकांनी गर्भलिंग निदान करुन गर्भपात करण्याचा सल्ला दिला असं शिवकन्या चौधरी आपला अनुभव सांगता.आठराविश्‍व दारिद्रय, पती अपंग, तिसरी मुलगी होईल ही भिती होती..पण आज त्या आनंदी आहेत. शिवकन्या आणि शिवकन्यांसारख्या अनेक महिलामध्ये ही जाणीव निर्माण करुन दिली ती बीडच्या सावित्रीबाई फुले महिला मंडळानी..या संस्थेकडून एकटया शिवकन्याचंच परिवर्तन केलं नाही तर बीड जिल्हयातील 220 गावामध्ये हे काम सुरु आहे. संचालिका मनिषा तोकले म्हणता, या संस्थेतर्फे गावंामध्ये महिलांचे गट तयार करण्यात आलेत. या गटातील महिला हे काम करतात. स्त्रीभ्रूण हत्येमुळे बीड जिल्हयाला लागलेला काळिमा दूर करण्यासाठी सावित्रीच्या या लेकीचं मंडळ स्वत:चं झटतंय. स्त्रीभ्रूण हत्येचा काळिमा पुसला जातोय आणि सोबतच अभिमानाने साजरा होतोय मुलींचा जन्म..

या संस्थेला आपण मदत करु शकतात

संस्थेचा पत्ता

सावित्रीबाई फुले महिला मंडळए-1, के के प्लाझा, चंपावती शाळेशेजारी,जुना नगर नाका, बीडफोन- 02442 220892मोबाईल- 9325056892

close