‘बर्फी’ला ऑस्करमध्ये तगडी टक्कर

October 1, 2012 1:43 PM0 commentsViews: 6

मनीषा महालदार, मुंबई

01 ऑक्टोबर

अनुराग बासूच्या बर्फीचा गोडवा जरा वाढलाच. प्रेक्षकांना हा सिनेमा आवडलाच पण सिनेपरीक्षकांनीही त्याचं कौतुक केलं. आणि आता तर बर्फीची भारतातर्फे ऑस्करसाठी एंट्री झालीय. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं बर्फीची निवड केली. ऑस्करसाठी 19 सिनेमांचा विचार केला गेला होता. त्यात विद्या बालनचा 'कहानी' आणि तिग्मांशू धुलियाचा 'पान सिंग तोमर'ही होता.

दिग्दर्शक सुजित सरकारनं बर्फीच्या ऑस्कर एंट्रीबद्दल बरेच प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. कारण त्यांचा विकी डोनरही या शर्यतीत मागे पडला.आतापर्यंत भारताकडून ऑस्करसाठी निवडलेल्या सिनेमांमध्ये 1957ला मदर इंडिया, 1988ला सलाम बाँबे आणि 2001 मध्ये लगान याच सिनेमांना ऑस्कर नामांकनं मिळाली होती. त्यामुळे आपली सिनेमांची निवड योग्य असते का हाच मुख्य प्रश्न आहे. 85 व्या ऑस्कर ऍवार्डसाठी फॉरिन कॅटेगिरीत 40 देशांतले सिनेमे आहेत. यात मायकल हेनेकीचे ऍमॉर आणि किम की डक्स यांचं तगडं आव्हान आहे. या सिनेमांना व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये ऍवार्ड मिळाला आहे.

close