संगमनेरमध्ये बाप्पाना अजून निरोप नाही

October 1, 2012 2:35 PM0 commentsViews: 7

01 ऑक्टोबर

अनंत चतुर्दशीला बाप्पांना राज्यभरात निरोप देण्यात आला. पण, संगमनेरमध्ये मात्र बाप्पा अजून निरोपाची वाट पाहात आहेत. प्रवरा नदीत पाणी नसल्यानं संगमनेरमधल्या दिडशे गणेश मंडळांसह घरांतल्या गणपतींचंही विसर्जन करण्यात आलेलं नाही. पाण्याअभावी नदीचं गटार बनल्यानं त्यात विसर्जन करणार नाही अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतली आहे.

close