सिंचनावरुन राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार !

October 1, 2012 4:20 PM0 commentsViews: 3

01 ऑक्टोबर

सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवरून अजित पवारांनी राजीनामा दिला असला तरी प्रकल्पांच्या दिरंगाईसाठी काँग्रेसही जबाबदार असल्याची टीका आता त्यांनी केली आहे. एका अर्थानं काँग्रेसचा डाव काँग्रेसवरच उलटवण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न चालला आहे. सिंचन घोटाळ्यात चहू बाजूंनी घेरलं गेल्यानंतर.. इतके दिवस बचावात्मक असलेली राष्ट्रवादी आता आक्रमक झाली. वर्षानुवर्ष दिरंगाई झाल्यामुळे अनेक प्रकल्पांच्या किमती अनेक पटींनी वाढल्या. पण यासाठी सलग 13 वषंर् पाटबंधारे विभाग पाहणारं राष्ट्रवादीच जबाबदार नाही, असं स्पष्टीकरण अजित दादा देत आहे. राज्याच्या दौर्‍यावर निघालेल्या दादांनी आता.. भूसंपादन आणि पुनर्वसन, महसूल, कृषी या काँग्रेसकडच्या खात्यांकडे बोट दाखवलं.

तसंच सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करून उशीर करतात आणि किमती वाढवतात असं म्हणून धरणग्रस्तांवरही खापर फोडलंय.

अजित पवारांचे हे आरोप काँग्रेसने आणि सामाजिक संघटानांनी खोडून काढलेत. आता सरकारच्या बाहेर असल्यामुळे अजित पवार आता मुख्यमंत्रीच नाही. तर काँग्रेसकडे असलेल्या इतर खात्यांवर.. तसेच विरोधक.. सामाजिक कार्यकर्ते..सगळ्यांवर आरोप करायला मोकळे आहेत. यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढणार, हे निश्चित.

close