‘ उपहार ‘ जळीत प्रकरणी अन्सल बंधू दोषी

December 19, 2008 9:59 AM0 commentsViews: 6

19 डिसेंबर, मुंबई उपहार चित्रपटगृह जळीतप्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सत्र न्यायालयानं आरोपी अन्सल बंधूना दोन वर्षांची शिक्षा शिक्षा ठोठावली होती. आज कोर्टानं अन्सल बंधूची शिक्षा एक वर्ष कमी केली. अन्सल बंधू हे उपहार चित्रपटगृहाचे संचालक आहेत. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयानं पाच जणांना दोषमुक्त केलं आहे. त्यात श्यामसुंदर शर्मा, एन.डी. तिवारी, उपहार थिएटरचे मॅनेजर निर्मल चोप्रा, असिंटन्ट मॅनेजर आर.के.शर्मा आणि दिल्ली विद्युत बोर्डाचे अधिकारी ए. के. गेरा यांचा समावेश आहे. सत्र कोर्टानं अन्सल बंधूना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. 11 वर्षांपूर्वी दिल्लीच्या ' उपहार ' चित्रपटगृहात ' बॉर्डर ' चित्रपटसुरु असताना लागलेल्या आगीत 59 लोकांचा जळून मृत्यु झाला होता.

close