औरंगाबादेत आजही होते चरख्यापासून सुतकताई

October 2, 2012 12:37 PM0 commentsViews: 47

माधव सावरगावे, औरंगाबाद

02 ऑक्टोबर

औरंगाबादच्या एमजीएम संस्थेमध्ये खादी निर्मितीच्या माध्यमातून शाश्‍वत विकासाचा मंत्र दिला जातोय. इथला खादीनिर्मितीचा चरखा स्वदेशी आणि रोजगाराचं साधन तर झाला आहे. शिवाय खादीच्या प्रचार आणि प्रसारामध्ये मोलाचा वाटा उचलतोय.

औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशनच्या या खादी निर्मिती केंद्रामध्ये चरख्यापासून सुतकताई केली जाते आणि याच सुतकताईमधून खादीला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. 2009 साली या खादी निर्मिती केंद्राची सुरुवात झाली आणि खादी कारागीरांना रोजगार मिळाला. इथले खादीचे कपडे मार्केटमधल्या स्पर्धेला टक्कर देणारे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्या पिढीला साजेसा असा त्यात बदल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या रंगातल्या खादीसोबतच पैठणीही तयार केली जाते. आज देशभरात भरणार्‍या अनेक प्रदर्शनांमध्ये या खादीला प्रचंड मागणी आहे. या संस्थेत गेल्या 3 वर्षांपासून 1 लाख मीटर कपडा तयार केला गेला आहे. खादी निर्मितीबरोबरच महात्मा गांधी मिशन ट्रस्टने प्रियदर्शिनी उदयान तयार केलंय. अवघ्या तीन वर्षांमध्ये महात्मा गांधी मिशन यशस्वी होताना दिसतंय.

close