कधी-कधी नियमांना बगल द्यावी लागते -अजित पवार

October 2, 2012 3:39 PM0 commentsViews: 7

02 ऑक्टोबर

नुसती प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करून उपयोग नाही. कधी-कधी नियमांना बगल देऊनही कामं करावी लागतात, असा अप्रत्यक्ष टोला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. नाशिक आणि सातार्‍यानंतर आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा युवती मेळावा झाला. या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच अजित पवारसुद्धा उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केलं. दुसरीकडे, अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यानी दिली.

close