महिला पोलिसांवर हात उचलणार्‍या कार्यकर्त्याला जामीन

October 2, 2012 4:01 PM0 commentsViews: 5

02 ऑक्टोबर

लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्याला आज पोलिसांनी अटक करुन त्याची जामिनावर सुटका केली. महिला पोलिसाला शिवीगाळ तसंच हात उचलल्याप्रकरणी उमेश जाधव या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली होती. रांगेतल्या भाविकांना धक्काबुक्की कऱण्याचा प्रयत्न उमेश जाधवनं केला असता या महिला पोलिसानं त्याला अडवलं मात्र उमेश जाधवनं या महिला पोलिसावरच हात उगारला. त्यानं मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट होताच आज त्याला अटक करण्यात आली.

close