‘अजित पवारांच्या राजीनाम्याचा मंत्रालय आगीशी संबंध’

October 3, 2012 2:38 PM0 commentsViews: 7

03 ऑक्टोबर

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच धाडस कसं काय केलं ? पण आरोपाच्या फैर्‍यातून सुटका कशी होणार किती दिवस आपण पुंगी वाजवत बसणार ? अजित पवारांच्या राजीनाम्याचा संबंध हा मंत्रालयात लागलेल्या आगीशी तर नाही ना ? अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी अजितदादांवर केली. राज्याचा गाडा जेथून हाकला जातो तिथे एवढी मोठी आग कशीच लागू शकते. एवढ सगळं होऊन सुध्दा हे यावर राजकारण करतात हे सगळ्यात निंदनिय आहे असा खोचक टोलाही उध्दव ठाकरेंनी लगावला. तर याच वेळी 14 ऑक्टोबर पर्यंत जर इंदू मीलची जागा आमच्या ताब्यात मिळाली नाही तर 15 ऑक्टोबर पासून राज्यात जेलभरो आंदोलन छेडू अशी घोषणा रामदास आठवलेंनी केली. 2014 साली सत्ता ही महायुतीचीच येईल असा दावा गोपीनाथ मुंडेंनी केला. आज रिपाइंचा 55 वा वर्धापन दिन मुंबईत साजरा होत आहे. यावेळी ते बोलत होते.

close