बिग बींची बर्थ डे पार्टी

October 11, 2012 11:53 AM0 commentsViews: 8

11 ऑक्टोबर

बिग बी अमिताभ बच्चन आज 70 वर्षांचे झाले. बच्चन कुटुंबीयांकडून काल बिग बॅश पार्टी देण्यात आली. यावेळी सिनेसृष्टीतले सगळे कलाकार बिग बींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतले सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजिवी यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. फिल्मी सेलिब्रिटीं बरोबरच बिझनेस आणि राजकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते..

close