भुजबळांचं ‘सिक्रेट’ : हे घोडे कोणाचे ?

October 11, 2012 5:13 PM0 commentsViews: 23

11 ऑक्टोबर

नवी मुंबईतील खारघरमधल्या भुजबळांच्या 'हेक्सवर्ल्ड'च्या ठिकाणी आमची प्रिन्सिपल करस्पाँडंट अलका धुपकर हिने भेट दिली तेंव्हा काही 'सिक्रेट' गोष्टी समोर आल्यात. या प्रकल्पात महागड्या घोड्यांचा आलिशान तबेला आढळून आला. हे घोडे ऑस्ट्रेलिया,इंग्लंड आणि राजस्थानमधून खरेदी केली असल्याची माहिती समोर आली. या घोड्यांसाठी खास तबेले आणि त्यांची देखभाल करणारे वेगळे कर्मचारी आहे. आमच्या टीमने सुरक्षारक्षक, व्यवस्थापकाला याची विचारपुस केली असता त्यांनी चकार शब्द सुधा काढला नाही. एव्हान आपली नाव सांगण्यासही नकार दिला. उलट कॅमेरे बंद करा तुम्हाला कोणी पाठवलं अशी उलट प्रश्न विचारून टीमला गेट बाहेर काढलं. कुणी कुठलीही माहिती द्यायला तयार नव्हते. या संपूर्ण प्रकल्पाबद्दल कमालाची गुप्तता पाळली जात असल्याचं यावरून स्पष्ट झालंय.

close