माझ्या कुटुंबीयांनी कुठलाही गैरव्यवहार केला नाही – भुजबळ

October 11, 2012 5:45 PM0 commentsViews: 9

11 ऑक्टोबर

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व आरोपांचं खंडन केलंय. मी किंवा माझ्या कुटुंबीयांनी कोणताही गैरव्यवहार केला नाही. खारघर येथील प्रकल्पामध्ये असलेले घोडे कोणाचे आहे हे मला माहिती नाही. त्या व्यवहारबद्दल समिर भुजबळांना विचारणा करावी. माझ्यावर आजपर्यंत अनेक आरोप झालेत. मी मंत्रीपदावरुन पायउतारही झालो पण ते सर्व आरोप बिनबुडाचे निघाले त्यामुळे पुन्हा मंत्री होऊ शकलो जर माझ्यावर झालेल्या आरोपात मी दोषी आढळलो तर शिक्षेस मी पात्र आहे असं स्पष्टीकरण भुजबळांनी केलं.

close