टोल मागितला म्हणून खासदाराने दाखवली बंदूक

October 12, 2012 1:45 PM0 commentsViews: 4

12 ऑक्टोबर

टोल मागितला म्हणून गुजरातमध्ये एका खासदारानं टोलनाक्यावर बंदुकीचा धाक दाखवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काँग्रेसचे पोरबंदरचे खासदार विठ्ठल राडिया यांनी बडोद्यामध्ये एका टोलनाक्यावर कर्मचार्‍यांना बंदुकीचा धाक दाखवल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसतंय. काही वेळ अशाप्रकारे बंदुक घेऊन मिरवल्यानंतर हे खासदार महोदय येथून निघून गेले.

close