कोकण रेल्वेचे बोगदे अजूनही असुरक्षित

December 19, 2008 10:54 AM0 commentsViews: 16

19 डिसेंबर रत्नागिरीदिनेश केळुसकर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरच्या गाड्यांचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. पण रेल्वेमार्गावरच्या बोगद्यांच्या सुरक्षेबाबत कोकण रेल्वे अजूनही उदासीनच आहे. अनेक महत्त्वाच्या कंट्रोल सिस्टिम्सवर देखभालीसाठी कर्मचारीच तैनात नाही. मुंबईवरील हल्ल्यानंतर कोकण रेल्वेमधील संशयास्पद सामानाची तपासणी सी आर पी एफकडून होऊ लागली आहे. पण कोकण रेल्वेचे बोगदे अजूनही सुरक्षित नाही. इथे 24 तास पेट्रोलिंग असूनही घातपाती कारवाया होऊ शकतात. बोगद्यामध्ये कोणीही ये-जा करू शकतं. तसंच बोगद्यामधलं वायरिंगही उघड्यावरच आहे त्यामुळे घातपाती कारवायासाठीही इथल्या विद्युत प्रवाहाचा अगदी सहज वापर होऊ शकतो. कोकण रेल्वे मार्गावर क्लिप्स काढण्यासारख्या घातपाती घटनाही अनेक वेळा घडल्या आहेत. मुंबईवरील दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकडे कोकण रेल्वे आता तरी गांभीर्यानं बघणार का हाच प्रश्न आहे.

close