अजय देवगण महालक्ष्मीच्या चरणी

October 12, 2012 11:51 AM0 commentsViews: 167

12 ऑक्टोबर

चित्रपट अभिनेता अजय देवगण यानं आज सहकुटुंब कोल्हापुरमधल्या महालक्ष्मी मंदिरात देवीचं दर्शन घेतलं. अजयची पत्नी आणि त्याचे आईवडिलही त्यांच्यासोबत होते. यावेळी अजयनं देवीला साडी अर्पण करुन देवीचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे याआधी बोलबच्चन चित्रपटाच्या वेळीही त्यानं महालक्ष्मीचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळं त्यांच्या आगामी 'सन ऑफ सरदार' या चित्रपटासाठीच अजयनं करवीरनिवासिनी महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याची चर्चा आहे.

close