वसई विरार पालिकेच्या आयुक्तांना नगरसेवकांकडून मारहाण

October 12, 2012 3:30 PM0 commentsViews: 8

12 ऑक्टोबर

वसई विरार महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांना जनआंदोलन समितीच्या नगरसेवकांनी मारहाण केली. महापालिकेच्या स्विकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरुन आयुक्त आणि नगरसेवक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी नगरसेवकांनी केलेल्या हल्ल्यात आयुक्तांच्या डोक्याला मारलागून ते जखमी झाले. याप्रकरणी संजय कोळी आणि प्रविण कांबळी या दोन नगरसेवकांना पोलिसांनी अटक केली. आयुक्तांना झालेल्या मारहाणी बद्दल पालिकेतील सर्व कर्मचार्‍यांनी काम बंद करुन निषेध व्यक्त केला.

close