नवरात्रीसाठी नक्षीदार घटांना मागणी

October 13, 2012 11:21 AM0 commentsViews: 40

13 ऑक्टोबर

नाशिकच्या गंगाघाटावर नवरात्रीसाठी आकर्षक घट तयार केले जात आहेत. अत्यंत सुबक कलाकुसर आणि मोहक नक्षीकाम केलेल्या या घटांना विशेष मागणी असते. यंदाही हे घट 50 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. घटावरचं रंगकाम आणि कलाकुसर यावर ही किंमत ठरवली जाते. काही ठिकाणी या घटात दिवे लावून त्याभोवती गरब्याचा फेर धरला जातो तर काहीजण या घटांचा घटस्थापनेसाठी वापर करतात. अत्यंत आकर्षक दिसत असलं तरी तितकीच किचकट कलाकुसर असल्यानं एके का घटांसाठी कलाकारांना एकेक दिवसही लागतोय.

close