प्रशांत दामले -कविता लाड 9 वर्षांनंतर रंगभूमीवर

October 13, 2012 1:16 PM0 commentsViews: 262

अजय परचुरे, मुंबई

13 ऑक्टोबर

अभिनेता प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड- मेढेकर ही जोडी तब्बल 9 वर्षानंतर 'माझिया भाऊजींना रीत कळेना' या नाटकाद्वारे रंगभूमीवर येतेय. तसंच या नाटकाचं दिग्दर्शन करतोय संतोष पवार. मराठी रंगभूमीवरची सर्वात यशस्वी जोडी म्हणजे प्रशांत दामले आणि कविता लाड -मेढेकर . ही जोडी तब्बल 9 वर्षानंतर आपल्या अचूक टायमिंग आणि विनोदांसह रंगभूमीवर परततेय. 'माझिया भाऊजींना रीत कळेना' या नवीन नाटकाची सध्या जोरात रिहर्सल सुरू आहे. या नाटकाचं वैशिष्ठय म्हणजे संतोष पवार या नाटकाचं दिग्दर्शन करतोय. संतोष पवारची धमाल कॉमेडी आणि प्रशांत आणि कविताची यशस्वी जोडी हा या नाटकाचा प्लस पांईट ठरणार आहे. चंद्रलेखा निर्मित हे नाटक दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर रंगभूमीवर येतंय. पण रसिकांना उत्सुकता आहे ती संतोषच्या धमाल तडक्याची आणि प्रशांत कविता या जोडीला रंगभूमीवर पुन्हा एकदा पाहण्याची..

close