कसाब पाकिस्तानीच – नवाज शरीफ

December 19, 2008 11:14 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबरपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अखेर कसाब पाकिस्तानीच असल्याचं सांगून भारताच्या पुराव्याला दुजोरा दिलाय. शरीफ यांच्या वक्तव्यामुळे असिफ अली झरदारी मात्र आता अडचणीत आलेत. फरीदकोटमधल्या त्याच्या घराला एवढी सुरक्षा व्यवस्था का पुरवली, त्याच्या कुटुंबियांना कुणालाही भेटू दिलं जात नाही. पाकिस्तान सरकार हे सगळं कशासाठी करतंय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तानातल्या जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरीफ बोलत होते. दहशतवाद रोखण्यासाठी आता लष्करानं योग्य पाऊल उचलण्याची वेळ आलीय, असंही शरीफ म्हणाले. दहशतवादाच्या मुद्यावर यु टर्न घेणार्‍या झरदारींना आता खर्‍या अर्थानं विचार करण्याची वेळ आलीय, असा टोलाही शरीफ यांनी लगावला.

close