अंधांनी तयार केलं सचिनच्या कारकिर्दीवर ऑडिओ बुक

October 15, 2012 4:13 PM0 commentsViews: 7

15 ऑक्टोबर

पुण्यातल्या क्रिकेटवेड्या ब्लाईंड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या सचिनला एक खास भेट दिली आहे. या अंध क्रिकेटप्रेमींनी सचिनचं 'ध्रुवतारा' नावाचे ऑडिओ बुक तयार केलंय. या सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:हा सचिनच्या खासगी आयुष्यापासून ते मैदानापर्यंत प्रत्येक माहिती ऑडिओ बुकमध्ये नमूद केली आहे. काहीदिवसांपुर्वी सचिनने या शाळेला भेट दिली होती. यावेळी त्याने मुलांना आपली बॅट भेट दिली होती. त्यामुळे प्रभावित झालेल्या या मुलांनी क्रिकेटची प्रॅक्टीस सुरू केली. आज पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यावर या अंध मुलांनी क्रिकेटची मॅचही खेळली. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या भेटीमुळे सचिनही भारावून गेला त्याने विद्यार्थ्यांचं कौतुक तर केलंच त्याच्या भावी वाटचालीला खूप शुभेच्छाही दिल्यात.

close