पुण्यात महालक्ष्मीला 13 किलोची सोन्याची साडी अर्पण

October 16, 2012 4:09 PM0 commentsViews: 71

16 ऑक्टोबर

पुण्यातल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये आज ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी एका अज्ञात भक्तानं देवीला 13 किलो वजनाची सोन्याची साडी भेट दिली. पंडित जसराज यांच्या हस्ते ही साडी अर्पण करण्यात आली. उपस्थितांच्या आग्रहावरुन पंडितजींनी यावेळी देवीची खास प्रार्थना सादर केली.

close