सैफ-करिना अडकले लग्नाच्या बेडीत

October 16, 2012 11:55 AM0 commentsViews: 24

16 ऑक्टोबर

बॉलिवूडचा 'नवाब' आणि 'बेबो' यांच्या प्रेम प्रकरणाचा आज क्लायमेक्स झाला. छोटे नवाब सैफ अली खानने कबूल हे म्हणत करिनाला आपली बेगम केलं तर करिनांनेही सैफमियाँला शोहर म्हणून स्विकारलं आहे. सैफच्या वांद्रे इथल्या घरी रजिस्टर पद्धतीनं सैफिनाचं लग्न झालं. अत्यंत साध्या आणि मोजक्याच पाव्हण्याच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याला शर्मिला टागोर, रणधीर कपूर आणि बबिता यांनी साक्षीदार म्हणून सही केली. आज संध्याकाळी लग्नाचं जंगी रिसेप्शन होणार आहे. तिथे अख्खं बॉलिवूड लोटणार आहे. गेस्ट लिस्टमध्ये शाहरूख खान सलमान खान आणि बिग बी आहेच. हे शाही लग्न पतौडी पॅलेसमध्येही साजरं होणार आहे. शर्मिला टागोरनं खास हा समारंभ आयोजित केलाय. यावेळी राजकीय नेतेही लग्नाला येणार आहेत. त्यानंतर दोघंही हनिमूनला परदेशी जातील आणि जानेवारीत भोपाळमध्ये पतौडींच्या पारंपारिक घरात बेबोचा गृहप्रवेश होणार आहे. बॉलिवूडच्या या राजेशाही लग्नाला आयबीएन लोकमतच्या शुभेच्छा.

close