माझ्यावरचे सर्व आरोप खोटे -गडकरी

October 17, 2012 4:17 PM0 commentsViews: 2

17 ऑक्टोबर

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केजरीवाल यांचे सर्व आरोप खोडून काढले. कोणतीही जमीन बळजबरीनं शेतकर्‍यांकडून घेतली नाही, तसंच ही जमीन महाराष्ट्र सरकारनं 15 वर्षांच्या भाडेकरारावर दिली असून या जमिनीवर आपण सहकारी साखर कारखाना चालवतो असं प्रतिउत्तर गडकरी यांनी दिलं.

काँग्रेसनं 22 सहकारी कारखाने काढण्याचे प्रयत्न केले पण एकही यशस्वी झाला नाही. फक्त आमचा पूर्तीचा प्रयोग यशस्वी झाला. शेतकर्‍यांच्या हितासाठी सोशल एन्टरप्राईझच्या रुपात मी काम करतो. सहकारी क्षेत्रात राजकारण होतं त्यामुळे पब्लिक लिमिटेड या प्रकारात जवळपास सहकारी मॉडेल मी राबवलंय. जमिनीच्या बाबतीतले आरोप निराधार आहेत. धरण बनल्यावर जमीन वेस्ट लँड म्हणून पडीक होती. ती जमीन पूर्ती समृद्धी सिंचन कल्याणकारी संस्थेसाठी 1984 मध्ये लिझवर घेतली. इथे ऊसाचं सॅम्पलिंग करून शेतकर्‍यांना कमी दरात दिली जातं असं स्पष्टीकरण गडकरी यांनी केलं. तसेच जो सिंचन घोटाळा आहे तो भाजपनं बाहेर काढला. मी भाजपचा अध्यक्ष आहे. दिल्लीत गेल्यावर मी महाराष्ट्रातल्या कुठल्याच प्रकरणावर प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ मी मौन पाळलंय असं होत नाही. मी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता असाताना काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक घोटाळे बाहेर काढलेत. त्यामुळे हे आरोप चुकीचे आणि अन्यायकारी आहेत. मी सोशल एन्टरप्राईझ आहे. विदर्भातल्या किमान 10 हजार युवकांना रोजगार दिलाय. ऊस लागवड करून शेतकरी कर्जमुक्त कसा होईल, यासाठी मिशनसारखं काम करतो. बायो फ्युएल, बायो एनर्जी, बायो फर्टीलायझर, अल्टरनेटीव्ह एनर्जी, बायो एनर्जी, ऑरगॅनिक फार्मिंग, अशा प्रकारे शेतकर्‍यांची मदत करतो. हा माझा व्यवसाय नाही, मिशन आहे. मी कुठल्याही चौकशीसाठी तयार आहे. मेरा दामन साफ है, मी कुणाची चिंता करत नाही असं उत्तर गडकरी यांनी दिलं.

close