औरंगाबादमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम जोरात

December 19, 2008 11:54 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबर, औरंगाबाद औरंगाबादमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेनं जोर धरलाय. क्रांती चौक ते सिटी चौक रस्ता रूंदीकरणात अडसर ठरलेल्या पैठणगेट इथल्या 11 मालमत्ता जमीनदोस्त करुन महापालिकेनं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम हटवण्याची मोहीम आज पुन्हा सुरू केली. न्यायालयनं स्थगिती उठवल्यानंतर महापालिकेनं ही मोहीम तीव्र केली आहे. शहरातील क्रांती चौक ते सिटी चौक, रेल्वे स्टेशन आणि चिकलठाणा भागातील मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणं हटवण्याची मोहीम न्यायालयाच्या स्थगितीमुळे गेली चार वर्षे थंडावली होती. गुरुवारी लागलेल्या निकालानंतर ही मोहीम पुन्हा सुरू झाली. पैठणगेट येथील दुकानं महापालिकेनं आज जमीनदोस्त केली. सिल्लेखाना पैठणगेट रस्ता रूंदीकरणात न्यायालयाचा अडसर राहिला नाही. लोकांनीही या कामात सहकार्य केलं. दुकान आणि घर मालकांना 18 हजार रूपयाप्रमाणे मोबदला देण्यात येत आहे. काहींना टीडीआर कायद्यानुसार एफएसआय वाढवून देण्यात येत आहे ' असं शहर अभियंता भागवत म्हस्के यांनी सांगितलंय.

close