केजरीवालांनी भ्रष्टाचाराची प्रकरणं तडीस न्यावी -अण्णा हजारे

October 20, 2012 4:15 PM0 commentsViews: 2

20 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल अजूनही आपल्या संपर्कात आहे त्यांनी एकावेळी एक प्रकरण तडीस न्यावं आणि त्यानंतरचं दुसरं प्रकरण हाती घ्यावं असा वडीलकीचा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी नव्या दमानं आता भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला सुरुवात करणार आहेत. जानेवारीपासून अण्णा देशव्यापी दौरा करणार आहेत. अण्णा हजारेंनी अनेक दिवसानंतर आपलं मौन सोडलंय.आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी अण्णांनी मनमोकळी बातचीत केली.

close