..तर राजकारण सोडेन -भुजबळ

October 20, 2012 2:46 PM0 commentsViews: 2

20 ऑक्टोबर

महाराष्ट्र सदनात एक रुपयांचा जरी नवा घोटाळा सापडला तर मंत्रिपदाचा नाही तर राजकारणाचाच राजीनामा देऊन टाकेन अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली. तसंच महाराष्ट्र सदनात घोटाळा झाला राजीनामा द्या म्हणतात पण का म्हणून राजीनामा द्यायाचा ? दिल्लीत महाराष्ट्राची शान असणारी ही दिमाखादार वास्तू उभारण्यात आली आणि यासाठी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाही देण्यात आला नाही. एक इंच जागाही देणे नाही. दिला आहे फक्त टीडीआर तोसुद्धा महाराष्ट्र सरकारच्या युडीपासून ते मंत्र्यांच्या कमिटीपर्यंत सगळ्यांच्या मंजुरीने देण्यात आला आहे असा खुलासा भुजबळ यांनी केला. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसाचं राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात सुरु आहे त्यावेळी ते बोलत होते.

close