सिंचनाची आकडेवारी कागदोपत्रीच फुगवली -पांढरे

October 22, 2012 10:59 AM0 commentsViews: 16

22 ऑक्टोबर

गेल्या 10 वर्षात सिंचनाची टक्केवारी 28 टक्क्यांनी वाढल्याचा दावा केला होता. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी तसंच माजी मंत्री अजित पवारांनी उपसा सिंचन योजनांचं जोरदार समर्थन केलं होतं पण सिंचन घोटाळा चव्हाट्यावर आणणारे मेरीचे मुख्य इंजिनिअर विजय पांढरे यांनी पुण्यातच तटकरे ाणि पवार यांचे दावे खोडून काढले. गेल्या 10-12 वर्षात प्रत्यक्ष फिल्डवर न फिरता केवळ कागदोपत्री सिंचनाची आकडेवारी गोळा केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा पांढरे यांनी केला. जलसंपदा खात्याच्या प्रकल्पांच्या अंदाजपत्रकात विहीर सिंचनाखालच्या क्षेत्राचा समावेश नसताना मुद्दाम सिंचनाची आकडेवारी फुगवण्यासाठी अहवालात 29 टक्के क्षेत्र सिंचनाखाली असल्याचं चुकीचं नमूद करण्यात आलंय असं सांगत तटकरे यांच्या दाव्यातील हवा काढली तर राज्यातील 227 उपसा योजनांपैकी अवघ्या 2 ते 3 टक्के उपसा योजना सुरू असून ज्या इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या जलसंपदा खात्याच्या महामंडळातर्फे उपसा योजना चालवण्यात येतात महामंडळ भंगारच्या भावात विकावं लागलं असा गौप्यस्फोट करत अजित पवारांना घरचा अहेर दिला. गेल्या 40 वर्षात हजारो कोटी रूपये खर्चून जे प्रकल्प झाले ते पाहता सिंचनाचा अंदाज सपशेल चुकला असून सिंचन धोरणाचा पुनर्विचार करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा पुनरूच्चार पांढरे यांनी केला. युक्रांद आयोजित सिंचन परिषदेत पांढरे बोलत होते.

close