शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज

October 23, 2012 4:23 PM0 commentsViews: 5

23 ऑक्टोबर

यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा बुधवारी मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडतोय. हा परिसर सायलेन्स झोन असल्यामुळे हायकोर्टाने या मेळाव्याला सशर्त परवानगी दिली आहे. या मेळाव्याला बंदोबस्तासाठी सुमारे एक हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. या संपूर्ण मेळाव्यावर सीसीटीव्ही कॅमेरेचीही नजर असणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरचा शेवटचा मेळावा असणार आहे. पुढच्यावर्षी सेनेनं दुसरं ठिकाणं शोधावं असं कोर्टाने स्पष्ट नमूद केलं आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतलाय सिनियर करस्पाँडन्ट विनोद तळेकरने…

close