गडकरींच्या कंपन्या झोपडपट्टीत

October 23, 2012 1:56 PM0 commentsViews: 6

23 ऑक्टोबर

पूर्ती ग्रुपच्या निविता ट्रेड्स, स्वीफ्टसोल, रिगमा फिनट्रेड, अश्विनी सेल्स आणि मार्केटींग आणि अर्नवेल ट्रेडस… या कंपन्यांचं जो पत्ता दाखवण्यात आला आहे. तो आहे अंधेरीतल्या एका चाळीतला. दुबे चाळ जिथून या कंपन्यांचं काम चालतं असं कागदावर दाखवण्यात आलं आहे. दरम्यान, नितीन गडकरी अडचणीत आले असताना पहिल्यांदाच पूर्ती ग्रुपनं या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. पूर्ती ग्रुप शुगरचे एमडी सुधीर दिवे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहे. नितीन गडकरी यांचा पूर्तीशी कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. महत्वाचं म्हणजे कुठल्याही चौकशीसाठी पूर्ती ग्रुप तयार असल्याचं सुधीर दिवे यांनी म्हटलं आहे.

close