ऑन ड्युटी पोलीस काँस्टेबल फुल्ल ‘चरसी’

October 23, 2012 2:04 PM0 commentsViews: 2

23 ऑक्टोबर

नाशिकमध्ये एका पोलीस काँस्टेबलनं चरसच्या नशेत भर रस्त्यावर ऑन ड्युटी गोंधळ माजवला. विशेष म्हणजे त्याच्याकडे असलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरनं तो लोकांना धमकावतही होता. राजेंद्र कदम असं या काँस्टेबलचं नाव आहे. सीव्हील हॉस्पिटलजवळ चालणार्‍या चरसच्या अड्‌ड्याचा बंदोबस्त करण्याऐवजी हा पोलीस स्वत:च चरसचे झुरके घेत होता. याची माहिती मिळताच पोलीस अधिकार्‍यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली. दरम्यान, या नशेबाज काँस्टेबलवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय.

close