आमदारांचे गाडी नंबरही व्हीआयपीच

December 19, 2008 10:05 AM0 commentsViews: 7

19 डिसेंबर नागपूर प्रशांत कोरटकर नागपूर विधान भवनाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सगळ्या गाड्या कुठल्या ना कुठल्या आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या आहेत. मगआमदार भाजपचा असो की काँग्रेसचा, शिवसेनेचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या गाडीचा नंबर मात्र व्हिआयपीच आहे. याबाबत बातमी अशी, आमदारांची गणती व्हीआयपी म्हणजे अति महत्वाच्या व्यक्तींमध्ये होते. मग आमदारांच्या गाड्या तरी साध्या कशा असणार. त्यांच्या नंबरप्लेटही त्या गाड्यांना साजेशा म्हणजे व्हीआयपींच असतात. आपल्या गाड्यांच्या नंबरबाबत आमदारांनी आपल्या जन्मतारखेवरून लकी नंबर घेतला आहे. तर कुणी ज्योतिषातील मूलांकानुसार नंबर घेतला आहे. कुणी बुवा- बाबा,बापू, माता यांच्याकडे जाऊन आपापले नंबर काढले आहेत.तर कोणी निवडणुकीत निवडून आलेल्या मतांच्या संख्येवरून आपल्या गाडीचा नंबर ठरवला आहे.गाड्यांच्या विशेष नंबरमुळे रस्त्यावरून आमदाराची गाडी चटकन ओऴखल्या जाते असंही काही आमदारांच मत आहे. या सर्व नंबरांच्या गणितात एकेरी नंबर असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही वर्षापर्यंत अनेक आमदार विधीमंडळाच्या बसगाडीतून आमदार निवास ते विधानभवन असा प्रवास करायचे. अ‍ॅम्बेसिडर, फियाट, कोरोला असणारा आमदार श्रीमंत मानला जायचा. पण आता कुणाकडे मर्सडिज आहे तर कुणाकडे फोर्डची नवी कोरी कार. कोणाकडे आहे ऑडी तर कोणाकडे पजेरो आहेत. एकूण काय तर आमदार आणि मंत्री श्रीमंत होत असल्याची ही लक्षणं आहेत. तात्पर्य राजा खातो तुपाशी प्रजा मात्र उपाशी.

close