कोल्हापूरमध्ये शाही दसरा सोहळा संपन्न

October 24, 2012 2:57 PM0 commentsViews: 17

24 ऑक्टोबर

कोल्हापूरमध्ये आज शाही दसरा सोहळा पार पडला. शहरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात करवीरनगरीचे छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे आणि मालोजीराजेंच्या उपस्थितीत शमीपूजन करण्यात आलं. आजच्या सोहळ्याचं मुख्य आकर्षण असलेल्या मेबॅक गाडीमधून छत्रपतींनी मानवंदना स्वीकारली. हा सोहळा पाहण्यासाठी आणि सोनं लूटण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी छत्रपती शाहूमहाराजांनी जनतेकडून शुभेच्छा स्वीकारल्या आणि त्यांनाही दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या.

close