मी थकलोय – शिवसेनाप्रमुख

October 24, 2012 5:45 PM0 commentsViews: 6

24 ऑक्टोबर

मी थकलोय, शारीरिक दृष्या कोसळलोय मला बोलताना ही धाप लागतेय, मला चालता येत नाही दिवसभर पडून असतो कसा हा आजार ? मला तुम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा होती पण जाऊ द्या. मी 45 वर्ष शिवसेना सांभाळली तुम्हाला सांभाळलं. आता उद्धव,आदित्यला सांभाळा..इमानाला महत्व द्या. मी घराणेशाही लादली नाही ती तुम्ही स्वीकारली आता तुम्हीच सांभाळून घ्या अशी कळवळीची विनंती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समस्त शिवसैनिकांसह महाराष्ट्राला केली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच बाळासाहेबांविना दसरा मेळावा पार पडला. पण या मेळाव्यात बाळासाहेबांचा संदेश एका व्हिडिओ फूटेजव्दारे ऐकवण्यात आलं. अत्यंत भावूक असं बाळासाहेबांचं रूप पाहून शिवसैनिक भावूक झाले, अनेकांना अश्रू अनावर झाले. बाळासाहेबांनी आपल्या शैलीत चौफेर तोफ डागली. पण यावेळी बाळासाहेबांना संदेश देताना अश्रू अनावर झाले.

close