ब्रुम..ब्रुम..अन् थरार

October 26, 2012 1:04 PM0 commentsViews: 6

26 ऑक्टोबर

येत्या रविवारी नोएडातल्या बुद्ध इंटरनॅशनल रेसिंग सर्किटवर एफ वनचा थरार अनुभवायची संधी मिळणार आहे. आज या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. फॉर्म्युला वनचे अध्यक्ष बर्नी ईक्लेस्टन तसंच जेपी ग्रुपचे अध्यक्ष मनोज गौर यांच्या हस्ते या ट्रॉफीचं अनावरण झालं. दरम्यान, या रेससाठी भारताबरोबरच परदेशातील क्रीडाप्रेमींनीही यायला सुरुवात केली आहे. पारंपारिक पद्धतीनं या क्रीडाप्रेमींचं स्वागतही केलं जातं आहे.

नुसत्या आवाजावरून रस्त्यावर फॉर्म्युला वन कार पळतेय हे कोणीही ओळखेल. फुटबॉल इतकाच जगात फॉर्म्युला वन हा खेळही तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. आणि भारतही याला अपवाद नाही. दुसर्‍या आंतरराष्ट्रीय ग्राँप्रिसाठी नोएडातलं बुद्ध इंटरनॅशनल सर्किट सज्ज झालंय. ट्रॅक आणि या इमारतीचं डिझाईनही अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. आणि जवळपास सर्वच टीम्सच्या ड्रायव्हर्सनं या ट्रॅकचं कौतुक केलंय.

बुद्ध इंटरनॅशनल रेसिंग सर्किट आहे तरी कसं ?

बुद्ध इंटरनॅशनल सर्किटचा हा ट्रॅक 5.14 किमीचा आहे. या ट्रॅकवर 16 वळण आहेत. तर इंडियन ग्राँ प्रित एकूण 60 लॅप्स असतील. याचाच अर्थ संपूर्ण रेस ही 308 किमीची आहे. तर या ट्रॅकवर गाडीचा सरासरी वेग ताशी 210 किमी इतका आहे. तर सर्वाधिक वेग हा ताशी 320 किमी इतका असणार आहे.

बुद्ध इंटरनॅशनल सर्किट वळणा वळणांचं आहे. आणि म्हणून ड्रायव्हर्ससाठी आव्हानात्मक आहे. आणि सर्किटमध्ये खुर्च्यांना लावण्यात आलेल्या तिरंगी रंगामुळे भारतीय प्रेक्षकही खुश आहेत.

close