स्पीड बोटीमुळे डिझेलचे स्मगलर्स पोलिसांच्या तावडीत

December 19, 2008 12:40 PM0 commentsViews: 6

19 डिसेंबर, मुंबईअजित मांढरेमुंबईतल्या येलो गेट पोलिसांनी समुद्रात डिझेलचं स्मगलिंग करणार्‍या एका टोळीला पकडलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन हजार लिटर डिझेल जप्त केलंय. गेली कित्येक दिवस पोलिसांना या टोळीचा शोध होता. अंडरवर्ल्डचा डोळा मुंबईवर नेहमीच असतो. मुंबईतच काळे धंदे करून दाऊदनं जगात आज आपलं जाळं पसरवलंय. मुंबईत आजही स्मगलिंग मोठ्या प्रमाणावर होतं. सुमद्रमार्गे स्मगलिंगचा मोठा कारभार आजही चालतो. त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहचणं शक्य नसतं. कारण पोलिसांकडे आधुनिक बोटी नाहीत. पण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांना दोन स्पीड बोटी देण्यात आल्यात. त्यामुळेच पोलिसांनी डिझेलची स्मगलिंग करणार्‍या दोन होड्या समुद्रात पकडता आल्या. पोलिसांनी त्याच्याकडून दोन हजार लिटर डिझेल हस्तगत केलंय. 'आम्हाला माहिती मिळाली होती की डिझेलच्या स्मगलिंग दूर समुद्रात होतंय. जुन्या बोटींनी त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं पण नवीन रॉफ्ट आल्यामुळे समुद्राचा कानाकोपरा चेक करता येतो ', असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूर मुलानी यांनी सांगितलं. पोलिसांकडे अत्याधुनिक साधनं नसल्यानंच तर स्मगलर्स आणि दहशतवाद्यांचा मुंबईत शिरकाव होऊ शकला. दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झालीय. पण दहशतवादी आणि स्मगलर्संना आवरण्यासाठी केवळ दोन स्पीड बोटींवर भागणार नाही. पोलिसांपुढं आव्हानं खूप मोठी आहेत.

close