सारं काही ‘इंग्लिश विंग्लिश’ !

October 27, 2012 11:43 AM0 commentsViews: 89

दिनेश केळुसकर, गोवा

27 ऑक्टोबर

गोव्याच्या बेबी कांबळे गावोगावच्या शेतकर्‍यांना शेती कशी करावी याचं मार्गदर्शन करता. शिकलेल्या नसतानाही त्या उत्तम इंग्रजी बोलतात. लाखोंचे व्यवहार करतात. गोव्यातल्या फाईव्ह स्टार हॉटेल्सना इंग्लिश भाज्या पुरवणार्‍या ऐंब्रोजिया ऑगैर्निक फार्मच्या त्या मालक आहेत.

'आय एम स्पीकर ऑन जॉन..दे आर लिसनिंग..दे विथ मी..डू यू वॉन्त टू टॉक विथ देम..? ओके नेव्हर माईन्ड. आय एम टेलींग एव्हरीथिंग हॅपन्ड..ओके..आय एम स्पीकर ऑन स्टूपीड……'

सरावाची इंग्रजी बोलणार्‍या या बाईंचं नाव आहे बेबी मसनू कांबळे. गाव: चंदगड तालुक्यातलं ईनाम कोळींद्रे. सध्याचं नाव बेबी जॉन फिमेस्टर. आज गोव्यातल्या फाईव्ह स्टार हॉटेल्सना इंग्लिश भाज्या पुरवणार्‍या ऐंब्रोजिया ऑगैर्निक फार्मची मालक आहेत. शाळेत कधीच गेल्या नाहीत. मोलकरीण म्हणून काम करणार्‍या बेबी कांबळे जॉन फिमेस्टरच्या प्रेमात पडल्या आणि त्यांचा वेगळाच प्रवास सुरु झाला.

बेबी कांबळेनं जॉन फिमेस्टरशी 1987 ला कोर्ट मॅरेज केलं आणि तिचा संसार सुरू झाला. पण वेगळं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बेबीला स्वस्थ बसू देईना. गोव्यात येणार्‍या विदेशी पर्यटकांसाठी मोठ्या हॉटेलमालकांना इंग्लीश भाज्यांची गरज होती. नेमकी हीच गरज ओळखून तिने आपल्या दीराच्या म्हणजे डेव्हीडच्या मदतीने चंदगडमधल्या या तिच्या गावी जमीन घेऊन इंग्लीश भाज्यांचा फार्म सुरू केला. आणि त्यासाठी बियाणं आणलं इंग्लंडमधून.बेबीचं पहिल्याच हंगामातलं प्रॉफ़िट होतं त्यावेळचे म्हणजे 22 वर्षांपूर्वीचे पन्नास हजार रुपये.!

बेबी कांबळे म्हणतात, तीन वर्षं मी हे प्रयत्न करायची ह्या भाज्या इंग्लीश भाज्या.मी म्हटलं जिद्दीनं करणार म्हणजे करणार ही शेती. अशी जिद्द मारलेली.नंतर ही जमीन घेतली डेव्हलप केली. चौथ्या वर्षी मला चांगलं पिक मिळालं. मग मी आस्ते आस्ते सगळ्या फ़ाईव्ह स्टार हॉटेल्स ना .. फ़ोट्गार्डन, ..ऑफ़ व्हॅलीज, मारीयेट हॉटेल या सगळ्याना आम्ही सॅम्पल दिलं त्यांनी पास केलं आणि नंतर आम्ही भाज्या घालायला स्टार्ट केल्या.

या फ़ार्ममध्ये आठ दहा प्रकारच्या इंग्लीश भाज्यांची लागवड केली जाते. लोलो रोझा, ग्रीन ओपल, रेड शेर , कार्ड्नर, आईसबर्ग, स्कॉस, बटरक्रान्च अशा भाज्यांचं बियाणं त्या आता स्वत: कल्टीव्हेट करतातआणि ते ही शंभर टक्के सेंद्रीय पध्दतीने. रासायनिक खताचा अजिबात वापर केला जात नाही.

समजा आम्ही लहान बाळाला कसतरी मुडदाडलं तर ते मरून जाईल..जमिनीचं तसच हाय..आम्ही तिला जर चांगलं खाद्य दिलं , चांगलं सांभाळून ठेवलं तर जमीन सुध्दा चांगलि राहाते असं बेबी कांबळे म्हणाल्यात.

अनेक कृषी मेळाव्यांमध्ये शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना बोलवण्यात येतं. दलित असल्याने गावचा विरोध होता. तरही त्या डळमळल्या नाहीत. स्वत:ला इतकं सिध्द करूनही मात्र समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अजूनही बदललेला नाही. इथला समाजच काय पण इथले लोकप्रतिनिधी सुध्दा बेबी कांबळेंच्या शेतीचा उल्लेख अजूनही म्हारणीची शेती असाच करतात. पण कोणी काहीही बोलो. त्यांचा शेतीचा व्यवसाय झपाट्याने वाढतोय.

close