गडकरींच्या ‘पूर्ती’त आणखी एका कंपनीचा खोटा पत्ता

October 27, 2012 4:06 PM0 commentsViews: 5

27 ऑक्टोबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींच्या पूर्ती समूहातल्या गैरव्यवहाराचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. नितीन गडकरींच्या वैणगंगा शुगर ऍन्ड पॉवरमध्ये गुंतवणूक करणार्‍या कंपनीनं नेरूळमधला पत्ता दाखवला. तो पत्ता खोटा असल्याचं आता समोर आलंय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही हाच पत्ता व्यवसायासाठी वापरला होता असा आरोप करण्यात आला होता.

close