आयबीएन-लोकमतमुळे मिळाला सोलापूरच्या खातेदारांना न्याय

December 19, 2008 12:49 PM0 commentsViews:

19 डिसेंबर सोलापूरसिध्दार्थ गोदाम सुरक्षिततेची हमी असणा-या पोस्ट खात्यातही आता भ्रष्टाचाराची लागण झाली आहे. सोलापुरातल्या पोस्ट कार्यालयात ठेवलेल्या वेगवेगळ्या ठेवी पोस्ट मास्टरनेच खोट्या सह्या करून हडप केल्या होत्या. हा तब्बल 15 ते 20 लाखांच्या रक्कमेचा अपहार झाला होता. एक-एक पैसा गोळा करून ठेवलेल्या 226 खातेदारांचं हे प्रकरण आयबीएन-लोकमत ने उचलून धरलं. परिणामी पोस्ट खात्यानं या खातेदाराचे रुपये त्याच्या खात्यावर जमा केले.गेल्या 25 वर्षांपासून सदर बाजारातल्या पोस्टात ठेवी आणि खाते सुरू करून देण्याचे काम इथले पोस्ट खात्याचे अधिकृत एजंट करतात. पण त्यांच्या खातेदारांच्या खात्यातून खोट्या सह्या करून लाखो रुपयांचा अपहार झाला होता. पोस्ट खात्याचे अधिकारी दाद देत नव्हते. त्यामुळे खातेदारांचे पैसे कसे द्यायचे असा प्रश्न त्यांच्या समोर होता.सदर बाजारातल्या छोट्याश्या पोस्ट खात्याच्या कार्यालयात एवढा मोठा अपहार झाला. इथला पोस्टमास्टर परमेश्वर चलवादी यानेच हा घोटाळा केला होता. आता चलवादीला पोस्ट खात्यानं निलंबित केलं आहे. त्याने हडपलेली रक्कम सरकारने आता खातेदारांना दिली आहे. पोस्ट खात्याच्या एका कर्मचा-याने केलेल्या भ्रष्टचाराचे चटके खातेदारंाना खावे लागले.आयबीएन-लोकमत ने प्रकरण उचलून धरलं. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर खातेदारांना न्याय मिळाला.5000 रुपयावरच्या रकमा गेल्या 7 वर्षांपासून देण्यास पोस्ट खातं टाळाटाळ करीत होतं.आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने खातेदार हवालदील झाले होते.आयबीएन-लोकमतने या प्रकरणाचा पाठलाग करीत गोरगरिबांच्या कष्टाची रक्कम त्यांना परत मिळवून दिली.

close