केजरीवालांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस कार्यकर्त्याचा राडा

October 31, 2012 2:02 PM0 commentsViews: 7

31 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल यांनी रिलायन्सवर निशाना साधला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एका व्यक्तीनं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. प्रश्न-उत्तराच्या काळात जगदीश शर्मा नावाच्या व्यक्तीनं गोंधळ घातला. जगदीश शर्मा हा दिल्ली प्रदेश काँग्रेसचा सचिव आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधानांवर आरोप केल्यामुळे व्यथीत होऊन केजरीवाल यांना जाब विचारला. तो थेट केजरीवाल यांच्याकडे सरसावला. मात्र इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी त्याला अडवलं. केजरीवाल यांनी त्याला प्रश्न विचारण्याची मुभा दिली. पण शर्मा यांनी आक्रमक होतं गोंधळ घातला. आयएसीच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून मारहाण केली आणि बाहेर काढलं. या गोंधळानंतर पुन्हा पत्रकार परिषद सुरु झाली.

close