दिवसअखेर भारताच्या 1 विकेटवर 179 रन्स

December 19, 2008 1:03 PM0 commentsViews: 1

19 डिसेंबर मोहालीसेहवाग शून्यावर आऊट झाल्यानंतर द्रविड आणि गंभीरने भारताचा डाव सावरला. त्याआधी टॉस जिंकून भारताने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.पण सकाळी पिचवरील दवाचा फायदा घेत ब्रॉण्डने सेहवागचा बळी घेतला. त्यानंतर द्रविड आणि गंभीरने सावध बॅटिंग करत भारताला सुस्थितीत आणून ठेवलं.दोघांनीही हाफ सेंच्युरी करत टी टाइमपर्यंत 134 रन्स केले. टी टाइमनंतर गंभीरने रन्स वाढवत कसोटीतील आपली चौथी सेंच्युरी पूर्ण केली. इंग्लंड विरुद्धची ही त्यांची पहिली सेंच्युरी. गंभीर 106 रन्स आणि द्रविड 65रन्सवर खेळत होते. अपु-या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. दिवस अखेर भारताने 1 विकेटवर179 रन्स केले.

close