भुजबळांनी महायुतीत सामील व्हावं -आठवले

November 5, 2012 1:48 PM0 commentsViews: 9

05 नोव्हेंबर

समर्थ राजकीय पर्याय उभा करण्यासाठी छगन भुजबळांनी महायुतीत सामील व्हावं असं आवाहन रिपाईचे नेते रामदास आठवलेंनी केलंय. राजकारणात ओबीसी नेत्यांना त्रास दिला जातो, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानंतरचं रामदास आठवलेंनी भुजबळांना हे आवाहन केलंय. गेल्या काही दिवसांपासून भुजबळांवर सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. तसंच उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे गेल्यावर भुजबळांचं पक्षातलं महत्त्व कमी झालं याचंही शल्य त्यांच्या मनात असल्याचं बोललं जातं.

close